रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्रिविष्णूपरी भगवा झेंडा एकचि हा ।। शिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाचि दर्या खवळे तिळभर न ढळे कणभर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाश पटा पट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा लिलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड हृधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई ।। महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर चालू झाली होती... राज्याभिषेकासाठी कोणती अशी निश्चित परंपरा नव्हती, रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. साडेचार् हजार राजांना न...
सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या महाराष्ट्र दिनी एकजूट होऊ आणि करोना वर मात करू जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा २०२० शोधुनी स्वर्ग धरतीवरी, भटकलो मी वाऱ्यापरी ... झुकल्या गर्विष्ठ माना जिथे, जिव जडला सह्याद्रीवरी ... सह्याद्री… आभाळाला भेदणारे अक्राळविक्राळ.. प्रचंड.. अतिप्रचंड.. डोंगर..! वरुन खाली बघितलं तर थेट पाताळात घुसलेल्या दऱ्या..! ताशीव कातळ कडे… गुढगंभीर गुहा-घळींनी ओतप्रोत भरलेला.. असा हा रौद्रभीषण सह्याद्री..!! नवख्या माणसाला बघूनच धडकी बसावी. पावसाळ्यात मात्र रंगीबेरंगी फुलांची वेलबुट्टी चित्तारलेली हिरवी शाल पांघरून हा सह्याद्री असाकाही नटतो, की याच्या राजबिंड्या रुपावरुन बघणाऱ्याची नजर हटूच नये..! आणि सह्याद्रीचं हे राजस रुपडं पहायचं असेल तर एकदा राजमाचीला गेलंच पाहिजे..... तर आम्ही ही गेलो होतो, योग असा आला, मी पुण्यात असताना, आम्ही रात्री रूम वर बसलो असता गप्पा मारत कि उद्या सुट्टी आहे तर कुठेतरी जायचा प्लॅन बनवू , मग मी, माझा मित्र पारस, ओंकार आणि गौरव असा आ...